सावंतवाडी शहरात बत्ती गुल
swt2535.jpg
53505
सावंतवाडीः शहरात अशाप्रकारे नभ दाटून आले होते.
सावंतवाडी शहरात बत्ती गुल
‘अवकाळी’ची चाहूलः आठवडा बाजारात आलेल्या ग्राहकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः अवकाळी पावसाच्या नुसत्या चाहूलीनेच सावंतवाडी शहरातील महावितरणची बत्ती लगेच गुल झाली. ना विजांचा लखलखाट ना ढगांचा गडगडाट केवळ वारा सुटला आणि बत्ती गुल झाली. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
शहरात आज सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि अवकाळी पावसाच्या चाहूलीने वीज गायब झाली. मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र, पावसाची चाहूल लागताच सर्वांचीच तारांबळ उडाली. खरेदी केलेला बाजार घेऊन घर गाठण्यासाठी सर्वांची एकच धांदल झाली. त्यातच विज पुरवठा खंडित झाल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागला. सध्या मार्च महिना असूनही प्रचंड उकाडा वाढलेला असल्याने सर्वांचीच अंगाची लाही लाही होत आहे. अशातच अचानकपणे दाखल झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत काहीसा गारवा पसरला असला तरीही विज गायब झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागल्याने महावितरणच्या नावाने अनेकांनी बोटे मोडली. दोडामार्ग, बांदा तसेच आंबोलीच्या सह्याद्री पट्ट्यात काही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र, शहरात केवळ पावसाची झलक पाहायला मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

