चिपळुणातील सामाजिक सलोखा कायम ठेवा

चिपळुणातील सामाजिक सलोखा कायम ठेवा
Published on

-ratchl२६१.jpg ः
२५N५३७०४
चिपळूण ः शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपअधीक्षक राजेंद्रकुमार राजमाने.
----
चिपळुणातील सलोखा कायम ठेवा
राजेंद्रकुमार राजमाने ः शांतता कमिटीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः सण, उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करू नये. सोशल मीडियावर एखादी पोस्ट करताना सामाजिक सलोखा तसेच धार्मिक भावना दुखावणार नाही, याची खबरदारी सर्वांनी बाळगावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
चिपळूण तालुका शांतता कमिटीची बैठक झाली. या वेळी राजमाने म्हणाले, सण, उत्सव आनंदाने साजरे करून शांततेत पार पडायला हवेत. चिपळूण तालुक्यात नेहमीच जातीय सलोखा जपला जात आहे. येथे सर्वच जातीधर्मातील लोक हे गुण्यागोविंदाने राहात आले आहेत. हाच वारसा पुढेही जपला जाईल, हीच शिकवण इथल्या नागरिकांची असल्याचे सांगितले. या वेळी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडल्या. बैठकीला पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे, सचिन सावंत, भारत पाटील, जिल्हा शांतता समितीचे शौकत मुकादम, प्रतापराव शिंदे, उमेश सकपाळ, विनोद झगडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com