पुर्येतील तरुणांनी जपली गोमुच्या नाचाची परंपरा

पुर्येतील तरुणांनी जपली गोमुच्या नाचाची परंपरा
Published on

- rat२७p५.jpg-
२५N५३७६३
साखरपा : गोमूचा नाच सादर करताना पुर्ये गावातील लोककलाकार.
----
पुर्येतील तरुणांनी जपली गोमुच्या नाचाची परंपरा
कोकणातील पारंपरिक लोककला; शिमगोत्सवात घरोघरी सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २७ : कोकणात शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. या शिमगोत्सवात पालख्यांच्या अनेक परंपरा गावागावांमध्ये श्रद्धेने जपल्या जातात. नमन, जाखडी, गोंधळ अशा लोककलांचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यामधीलच एक लोककला म्हणजे गोमुचा नाच. ही लोककला गेली दहा वर्षे अस्ताला जात असतानाच संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावातील काही तरुण मात्र ती श्रद्धेने जपत आहेत. दरवर्षी शिमग्यातून घरोघरी फिरणाऱ्या पालखीपाठून हे युवक घरोघरी जाऊन हा नाच सादर करत असतात.
गोमूच्या नाचामध्ये रवी गोरूले, यश गोरूले, आकाश गोवरे, आर्यान गोरूले हे तरुण आपली कला सादर करत आहेत. गंगादेवी मंडळ या नावाने हे कलाकार हा नाच सादर करतात. त्यांना ग्रामस्थ ढोलकीची साथ देतात. तसेच नाचादरम्यान वाघाची भूमिका जयाराम भोसले हे साकारतात. त्यापैकी रवी गोरूले, यश गोरूले, आर्यन गोरूले हे मुंबईत नोकरी करतात; पण शिमग्याच्या दिवसांत ते मुद्दाम सुटी घेऊन गावी येतात आणि नाचाची परंपरा चालवतात. गोमुचा नाच ही एकेकाळी कोकणची ओळख होती. ही लोककला सादर करणारे कलावंत आता लोप पावत आहेत. त्यामुळे ही लोककलाही अस्ताच्या वाटेवर आहे. ती टिकून राहावी, असा आमचा प्रयत्न असतो. आमच्या मंडळातील तरुणवर्ग ही कला सादर करत ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो, असे गावकर रवी गोरूले यांनी सांगितले.
---
दृष्टिक्षेपात...
* गोमुच्या नाचाची १० वर्षांची परंपरा
* पालखीपाठोपाठ घराघरात जाऊन लोककला सादर करण्याचा प्रयत्न
* नोकरी व्यवसायातून सुटी घेऊन लोककलेचा प्रचार
* शिमग्यात मुंबईतून गावी येतात तरुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com