

swt274.jpg
53800
शिवम चव्हाण
नेमबाजी स्पर्धेमध्ये
शिवमला कांस्यपदक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः डेरवण-रत्नागिरी येथे झालेल्या ‘डेरवण युथ गेम्स’मध्ये शिवम चव्हाण याने नेमबाजीमध्ये कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा १० मीटर पीप साईट, १० मीटर ओपन साईट आणि १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. यात सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी शिवम चव्हाण याने १४ वर्षांखालील गटात पीप साईट प्रकारात ४०० पैकी ३८७ गुण मिळून कांस्यपदक पटकावले. तो सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अॅकॅडेमी येथे नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर, विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. शिवम याचे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.