गोळप, पावसमधील माकड पकडण्याची मोहीम थंडच!

गोळप, पावसमधील माकड पकडण्याची मोहीम थंडच!
Published on

माकड पकडण्याची मोहीम थंडावली
गोळप, पावसमधील चित्र ; शेतकऱ्याच्यात नाराजी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ ः गोळप, पावस परिसरातील वानर, माकडांचा उपद्रव कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी उपोषणेही केली; मात्र या परिसरातील वानर पकडण्याची मोहीम थंडावली आहे. ऐन आंबा, काजू हंगामाच्या तोंडावर ही मोहीम थांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.
वानर, माकडे यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांना होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी या संदर्भात गोळप येथील बागायतदार अविनाश काळे यांनी निवेदने दिली. प्रसंगी उपोषणेही केली. त्यानंतर वानर, माकडे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पकडलेली माकडे जंगलात सोडण्यात येतात. त्याची सुरवात रत्नागिरी तालुक्यातून करण्यात आली. त्या वेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कोळंबे येथे वीस माकडे पकडण्यात आली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. या परिसरातील अनेक ठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वानर, माकडे असल्याचे अहवालात नमूद केले आहे; परंतु या भागामध्ये अजूनही संबंधित विभागाने माकडे पकडण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे आंबा, काजू हंगाम सुरू असताना वनविभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. सध्या भाजीपाला हंगाम सुरू असल्यामुळे वानर, माकडांचा त्रास वाढत आहे. त्यांना पकडले नाही तर शेती उद्ध्वस्त करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ज्या भागातून मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला त्या गावांकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
-----
कोट १
वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे; मात्र सुरवातीच्या काळात वानरं, माकडं पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. पथकाने आपली मोहीम अन्य ठिकाणी वळवली आहे; परंतु या ठिकाणी त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्यास त्यांचे उद्दिष्ट नक्कीच सफल होईल. त्या दृष्टीने वेळीच हालचाली करणे गरज आहे अन्यथा सर्व शेतकऱ्यांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल.
- अविनाश काळे, आंबा बागायतदारचित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com