डॉ. आंबेडकर वाचनालयाने वाचकांची संख्या वाढवावी

डॉ. आंबेडकर वाचनालयाने वाचकांची संख्या वाढवावी
Published on

-RAT२७p१७.JPG-
२५N५३८०५
चिपळूण ः बुरूमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष प्रारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुमित्रा महाजन.
------
डॉ. आंबेडकर वाचनालयाने वाचकांची
संख्या वाढवावी ः सुमित्रा महाजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्य कौतुकास्पद आहे. या वाचनालयात वाचकांची संख्या वाढली पाहिजे. चांगले उपक्रम हाती घेऊन वाचकांची संख्या वाढवा, असे आवाहन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.
चिपळूण शहरातील बुरूमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ लोकसभेचे माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महाजन यांनी वाचन संस्कृती टिकवणे अवघड होत असताना चिपळुणातील या दोन संस्था अभिनंदनीय काम करत आहेत, याचे कौतुक केले. अजूनही चांगले उपक्रम घेऊन नित्य वाचकांची संख्या वाढवावी, असे आवाहन केले. माजी आमदार रमेश कदम यांनी पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष सुचय रेडीज व प्रकाश देशपांडे यांच्या सहकार्याने चिपळूण नगर पालिका पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची सुरवात कशी झाली, याची आठवण सांगितली. या वाचनालयामुळे शहरातील बुरूमतळी, पाग, रावतळे आदी भागातील वाचकांची मोठी सोय झाली आहे.
उदयोन्मुख प्रख्यात चित्रकार शिरगावचा सुपुत्र संदीप ताम्हणकर याचा सत्कार सुमित्राताईंच्या हस्ते करण्यात आला. वाचनालयाच्यावतीने सुमित्राताई महाजन यांचा सत्कार अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी केला. रौप्य महोत्सवी शुभेच्छा समारंभास लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, सरोज नेने, वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com