

rat27p34.jpg
53875
राजापूरः पर्यावरणपूरक होलिकोत्सव साजरा करताना विद्यार्थी.
rat27p35.jpg
53876
राजापूरः पर्यावरणपूरक होळी.
--------------------
खरवतेमध्ये पर्यावरणपूरक होलिकोत्सव
कचरा, प्लास्टिकचे दहन : पर्यावरण संवर्धनाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ः तालुक्यातील खरवते ग्रामपंचायत आणि गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी शाळा परिसरातील जमा केलेला कचरा, प्लास्टिक, वापरलेल्या वह्यांचे कागद दहन करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. कोकणामध्ये सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवांचे ढोल वाजत असताना खरवते ग्रामपंचायत आणि उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साजऱ्या केलेल्या पर्यावरणपूरक होलिकोत्सवाचे सर्वांकडून कौतुक आणि स्वागत केले जात आहे.
या अभियानांतर्गंत तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये पर्यावरण जतन आणि संवर्धन करण्याची जनजागृती करणाऱ्या लोकसहभागातील विविध उपक्रमांचा समावेश आहे. उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील, विद्यार्थिनी अन् पर्यावरणदूत जस्लीन हाजू हिने वायूप्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या विषयी जनजागृती करणारे मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे साऱ्यांना आवाहन केले.
या वेळी खरवतेचे सरपंच अभय चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका जोशी, कुळ्ये, पर्यावरणदूत दयानंद चौगुले, काशिनाथ माटल, बाळू गुरव, चैत्रा गुरव, भक्ती माटल उपस्थित होते
चौकट
गावात स्थानिक प्रजातींच्या झाडांचे वाटप
खरवते ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना होलिकोत्सव आणि शिमगोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक उत्सव आणि सण साजरा करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये गावातील वाडीप्रमुखांना स्थानिक बेल, कडुलिंब, बांबू या स्थानिक प्रजातीची वृक्ष भेट देत त्यांची वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.