मंडणगड: शलाका पवार यांचा सन्मान

मंडणगड:  शलाका पवार यांचा सन्मान
Published on

rat२८p११.jpg-
५४०२५
मंडणगड: अंगणवाडी सेविका शलाका पवार यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे व अन्य.

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने
वेसवीच्या शलाका पवार यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ः वेसवीच्या अंगणवाडी सेविका शलाका पवार यांना मंडणगड पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी सेसअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
कुशल अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र बालशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत दैनदिन नोंदी निश्चित करण्यात पवार यांनी सातत्य ठेवले आहे. अंगणवाडी केंद्रात बालशिक्षण दिवस साजरा करून त्यामध्ये उल्लेखनीय कार्यक्रम केल्याबद्दल जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. पवार या वेसवी नांदगाव येथे कार्यरत आहेत. त्यांनी अंगणवाडीत बालविकासाकरिता लागणारे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. स्तनदा माता, गरोदर व किशोर मुली यांचा आहार, आरोग्य व स्वच्छता असे सप्टेंबरमध्ये अनेक उपक्रम राबवले. त्यासाठी मातापालक बचतगट ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले. मंडणगड येथे झालेल्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, बालविकास अधिकारी विकास जाधव, उमरोली बीट पर्यवेक्षिका एस. बी. कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com