धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष नको

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष नको
Published on

54042

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष नको

कावेरी चव्हाण ः पांग्रड ग्रामपंचायतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः महिलांनी केवळ चूल व मूल न सांभाळता स्वतः स्वावलंबी व्हावे. स्वतःला कमी समजू नये. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण स्वतः सुदृढ असलो तरच आपल्या कुटुंबाला आपण आधार देऊ शकतो, असे प्रतिपादन पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण यांनी आरोग्य शिबिरात केले.
पांग्रड ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या महिलांचे आरोग्य शिबिर व महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती वर्षा शिरोडकर, उपसरपंच महानंदा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्वाती मर्गज, प्रवीण मर्गज, पल्लवी मर्गज, मनीषा मर्गज, प्रथमेश मर्गज, ग्रामपंचायत अधिकारी आर. टी. सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक श्रीमती स्त्रीरोग तज्ज्ञ मार्गदर्शक प्रियांका सावंत यांनी महिलांना उद्भवणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली. कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य अधिकारी शिरोडकर, डॉ. मनिषा चुबे यांनी महिलांना होणाऱ्या आजारांबाबत रोगांची माहिती देत त्यांची लक्षणे व त्यावर कोणते उपचार करता येतील? त्यांची तपासणी कशी करावी? याबाबत योग्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पंच सदस्य, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. डॉ. मनिषा चुबे, डॉ. सचिन नागावकर आदींनी उपस्थित महिलांची आरोग्य चिकित्सा केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले.
------------------
महिलांनो, स्वावलंबी व्हा!
सरपंच चव्हाण यांनी महिलांनी केवळ चूल व मूल न सांभाळता स्वावलंबी व्हा. आपण स्वतः सुदृढ असलो तरच आपल्या कुटुंबाला आपण आधार देऊ शकतो, असे सांगून गावाच्या विकासासाठी व गावातील महिलांसाठी असेच वेगवेगळे उपक्रम मी व माझे सर्व सहकारी, ग्रामपंचायत सदस्य असेच उपक्रम राबवू ,असे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com