चौके वैभवलक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी संतोष गावडे

चौके वैभवलक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी संतोष गावडे
Published on

चौके वैभवलक्ष्मी पतसंस्था
अध्यक्ष गावडे यांचा सत्कार

मालवण, ता. २८ : चौके (ता.मालवण) येथील वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चौके या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संतोष गावडे यांची तसेच उपाध्यक्षपदी शिवप्रसाद चौकेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालय या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अजय हिर्लेकर, कृ. बा. करलकर, विधमान अध्यक्ष सुरेश चौकेकर, संचालक सुनिल चव्हाण, अरविंद तावडे, कमलाकर गावडे, विजय चौकेकर, विश्वनाथ गावडे, यमुना गोवेकर, अतुल मांलडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मोर्य उपस्थितीत होते. यावेळी विद्यमान अध्यक्ष सुरेश चौकेकर व जेष्ठ संचालक सर्वाचे मार्गदर्शक कृ. बा. करलकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल संतोष गावडे आणि शिवप्रसाद चौकेकर यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com