ग्रामीण भागातील रस्त्यावर प्लास्टिकचा खच

ग्रामीण भागातील रस्त्यावर प्लास्टिकचा खच
Published on

rat28p7.jpg
54020
रत्नागिरी : रत्नागिरी-पावस मार्गावर गोळप येथे उतारात नानाविध प्रकारचा कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला आहे.
rat28p8.jpg
54021
रत्नागिरी : वायंगणी फाटा येथून फणसोप हायस्कूलकडे जाणाऱ्या वळणावरही अशाच प्रकारे कचरा टाकून परिसर घाण केला आहे. रस्त्यावरूनच लोक येथे कचरा टाकतात.
----------
ग्रामीण भागातील रस्त्यावर प्लास्टिकचा खच
पर्यावरणाचा ऱ्हास; नद्या, समुद्रात प्रदूषण, मोकाट गुरांचे जीव धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याशेजारी तसेच शहरातही प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे, बाटल्यांचे खच पाहायला मिळत आहेत. हे प्लास्टिक मोकाट गुरे खातात तसेच काहीवेळा नदीकिनारी असल्यास पाण्यातून वाहून जात आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे.
प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्याचा अतिवापर होणे हे आपल्या निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी एक मोठा धोका बनला आहे. यामुळेच प्लास्टिकचा भस्मासूर सर्वांनाच घातक ठरणार आहे. लोक हाच भस्मासूर उघड्यावर, रस्त्याच्या कडेला टाकून आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत.
रत्नागिरी शहर, परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहायला मिळतो. जागोजागी प्लास्टिक संकलनासाठी स्वतंत्र कुंड्या ठेवल्या तरीही अनेक लोक गाड्यांवरून येताना रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकत आहेत. या अस्वच्छतेमुळे पर्यटनावरही परिणाम होतो. यात सुधारणा कधी होणार? असा यक्षप्रश्न पडला आहे. पावस-गोळप मार्गावर गोळप उतारात, वायंगणी फाटा, साखरतर पुलाजवळ, सोमेश्वर नदीकिनारी प्रचंड प्लास्टिक टाकलेले पाहायला मिळत आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्यातून घातक रसायने पर्यावरणात मिसळत असून, यामुळे लोकांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. यामुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड आणि इतर विविध विकार निर्माण होऊ शकतात. प्लास्टिक जरी वापरण्यास सोपे असले तरी त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम खूप गंभीर आहेत. प्लास्टिकचा कचरा जास्तीत जास्त तयार होतो आणि त्याचे निवारण करणे किंवा पुन्हा वापर करणे खूप कठीण आहे. त्याच्या फेकण्यामुळे किंवा नष्ट होण्यामुळे पृथ्वीवर आणि समुद्रात दीर्घकालीन प्रदूषण होत आहे.

चौकट १
हवी ही उपाययोजना
प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे तसेच इतर पर्यावरणदृष्ट्या अधिक टिकाऊ वस्तू जसे की, कागद, काच, स्टील वापरता येईल. ज्या प्लास्टिक वस्तूंचा वापर केला आहे त्याचे योग्यप्रकारे पुनर्वापर करता येईल. लोकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगण्यासाठी जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.

कोट
आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन गेल्या अनेक महिन्यांपासून अनबॉक्स युअर डिझायरतर्फे प्लास्टिक कचरा संकलन आणि जुने कपडे संकलन हे सामाजिक उपक्रम राबवत आहोत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अनबॉक्स युअर डिझायरकडून प्लास्टिक कचरा आणि जुने कपडे संकलन केले जातात व ते पुनर्प्रक्रियेसाठी दिले जातात.
- गौरांग आगाशे, अनबॉक्स, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com