राजापूर ः कांदळवन पुस्तकाचे राजापुरात प्रकाशन

राजापूर ः कांदळवन पुस्तकाचे राजापुरात प्रकाशन
Published on

rat28p5.jpg-
54010
राजापूरः कांदळवन पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखक गंगाराम गवाणकर, बालसाहित्यिक मदन हजेरी, वसंत तुळपुळे, संजय मांडवकर, सत्यवान कणेरी आदी.

कांदळवन पुस्तकाचे
राजापुरात प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ः लहानपणी कांदळवनात जगलेले आयुष्य बालसाहित्यिक मदन हजेरी यांनी लिहिलेल्या कांदळवन पुस्तकातून अनुभवायला मिळते, असे सांगत प्रसिद्ध लेखक आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी कौतुक केले.
कांदळवन या किशोर कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गवाणकर, हजेरी, वसंत तुळपुळे, सरपंच रामचंद्र कणेरी, मुख्याध्यापक संजय मांडवकर, गोठणे दोनिवडे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सत्यवान कणेरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पडवळ, मनोहर धुरी, नरसू कांबळे, विलास जाधव, संजय वाडेकर, अनंत गजोबार, विजय परब, राजेंद्र आचरेकर, सत्यवान गांगण उपस्थित होते. अणसुरे येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम झाला.
या वेळी गवाणकर म्हणाले, कोकणात आहे ते जगात कुठेही नाही. त्यापैकी कांदळवन एक आहे. निसर्ग पाहताना, अनुभवताना तो वाचायचा असतो. हजेरी यांनी निसर्ग वाचला अन् तो कांदळवन पुस्तकामधून साऱ्यांसमोर मांडला आहे. सरपंच कणेरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी कांदळवन किशोर कादंबरीचे लेखक हजेरी यांनी कांदळवन कादंबरी लिहिण्याची संकल्पना नेमकी कशी सुचली, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, बँकांमध्ये असलेल्या संपत्तीपेक्षा पुस्तकांमध्ये असलेली माहिती हीच खरी संपत्ती आहे. पुस्तकांमध्ये माणसासह सत्ता बदलण्याची क्षमता असल्याने लोकं आणि सत्ता पुस्तकाला घाबरतात. विविध पुस्तकांचे वाचन केल्यास निश्‍चितच त्यातून जगायचं कसं हे समजेल. सूत्रसंचालन संजय मांडवकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com