विधीमंडळ अंदाज व आश्वासन समितीवर आमदार किरण सामंत

विधीमंडळ अंदाज व आश्वासन समितीवर आमदार किरण सामंत
Published on

rat28p2.jpg
54006
किरण सामंत
-------------
विधिमंडळ अंदाज व आश्वासन
समितीवर आमदार किरण सामंत
रत्नागिरी, ता. २८ : विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्यशासनाने विधिमंडळाच्या महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या. लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांची पहिल्या टर्ममध्ये शासनाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर नियुक्ती केली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष यांनी २६ मार्चला या नियुक्त्या जाहीर केल्या.
अंदाज समितीच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पावर लक्ष ठेवले जाते तर आश्वासन समितीच्या माध्यमातून शासनाने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, याचा आढावा घेत असते. लांजा-राजापूर मतदार संघात विजयी झाल्यानंतर किरण सामंत यांनी छोट्याशा कार्यकाळात अनेक विकासकामांना गती दिली आहे. या दोन्ही समित्यांवर झालेल्या निवडीमुळे त्यांना राज्यस्तरावर छाप पाडण्याची संधी मिळाली आहे. त्यांची निवड करून पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची पोचपावती आणि मोठी संधी त्यांना निर्माण करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com