माड्याचीवाडीत श्री स्वामी समर्थ मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा

माड्याचीवाडीत श्री स्वामी समर्थ मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा
Published on

54061
श्री स्वामी समर्थांची मूर्ती
54062
गावडेकाका महाराज


माड्याचीवाडीत श्री स्वामी समर्थ मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा

उद्यापासून ६ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम ः कृष्णशिला दगडातील चैतन्यरुपी मूर्ती लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून माड्याचीवाडी, खालचीवाडी (कुडाळ) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा कलशारोहण व मूर्तीचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार (ता.३०) ते ६ एप्रिल या कालावधीत असून यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचे अवघ्या तीन महिन्यात बांधकाम पूर्ण झाले असून, कृष्णशिला दगडामध्ये श्री स्वामी समर्थांची चैतन्यरुपी मूर्ती साकारली आहे. २७ ला उदक शांती गणहोमने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ श्री स्वामी समर्थाच्या मुर्तीची (ढोलपथकासह) श्री देव गावडोबा मंदिर ते स्वामी मंदिर माड्याचीवाडी अशी मिरवणूक निघणार आहे. रात्री ८.३० वाजता स्वामींच्या मुर्तीचा धान्य अधिवास, ३१ ला सकाळी ७ वाजता स्वामी प्रकट दिन (स्वामी पादुकांवर अभिषेक), सकाळी ८.३० वाजता देवतांना निमंत्रण, स्वस्ती वाचन, सभारदान, जल अधिवास, आचार्य वरण, पिठ देवता स्थापन व पूजन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजता श्री स्वामी समर्थ मठ ते श्री देव गावडोबा मंदिर पालखी मिरवणूक सोहळा (ढोलपथकासह), १ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता आवाहीत देवता पूजन, होम हवन, प्राकार पौष्यण, पर्याय हवन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पारंपरिक फुगडी (श्री देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी ग्रुप, कविलकट्टा (कुडाळ) व आम्ही चारचौघी महिला ग्रुप ओरोस), रात्री ८ वाजता श्री वावळेवर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम, २ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता कलश पूजन व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० नंतर सुश्राव्य भजने महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, माड्याचीवाडी, श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, भगवती प्रासादिक भजन मंडळ, बांव, ३ एप्रिलला सकाळी ९ वाजता सामुदायीक अभिषेक, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पाककला स्पर्धा (महीलांसाठी), सायंकाळी ६ वाजता गवळीवाडी भजन मंडळ, कारिवडेचे भजन, रात्री ८ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिहर नातू, पुणे यांचे कीर्तन, ४ एप्रिलला सकाळी ९ वाजता सामुदायिक अभिषेक, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता समईनृत्य बहारदार कार्यक्रम पावणादेवी ग्रुप, किंजवडे, देवगड, रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी, कुडाळ विरुध्द हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे, कुडाळ, ५ एप्रिलला सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता स्वरबंदिश प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्लेचे भजन, रात्री ८ वाजता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित नृत्याविष्कार होईल.
---
६ एप्रिलला वाढदिवस अभिष्टचिंतन
६ एप्रिलला श्री गावडे काका महाराज वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा, सकाळी ११ वाजता औक्षण व संस्थेच्या शुभेच्छा स्विकार, ११.३० वाजता सत्कार सोहळा व बक्षीस वितरण, दुपारी १२ वाजता गावडे काका महाराजांचे मार्गदर्शन, दुपारी १ ते रात्री १० सद्‌गुरू दर्शन व आशीर्वाद सोहळा, दुपारी १.३० पासून अखंड महाप्रसाद, ३ वाजता श्री सद्‌‌गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी भक्तीगीत गायन. अधिक माहितीसाठी सिद्धेश किनळेकर, मनिष नाईक, एकनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com