मराठे कृषी महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेतीचे विद्यार्थ्यांना धडे

मराठे कृषी महाविद्यालयामध्ये 
सेंद्रिय शेतीचे विद्यार्थ्यांना धडे
Published on

54090

मराठे कृषी महाविद्यालयामध्ये
सेंद्रिय शेतीचे विद्यार्थ्यांना धडे

कणकवली, ता. २८ : फोंडाघाट (ता. कणकवली) येथील कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील कृषी शास्त्र विभाग अंतर्गत चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रात्‍यक्षिक घेतले. या विद्यार्थ्यांना प्रा. प्रसाद खांबल यांनी मार्गदर्शन केले.
सेंद्रिय शेती उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शेत जमिनीमध्ये सेंद्रिय भुईमूग पीक घेऊन प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला. सेंद्रिय पिकासाठी विद्यार्थ्यांनी शेतजमीन तयार करताना खत म्हणून शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट आणि पोल्ट्री खत समाविष्ट केले. तर पीक वाढ होत असताना पिकावर येणाऱ्या रोग, कीटक यांच्या नियंत्रणासाठी अग्नीअस्त्र, निमस्त्र, निम तेल अशा विविध सेंद्रिय औषधे तयार करून, तसेच त्‍याचा वापर करून रोगांवर व कीटकांवर नियंत्रण करण्यात यशस्वी ठरले. या प्रात्‍यक्षिकाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपेश मराठे, सल्‍लागार मिताली मराठे, संचालक जनार्दन देसाई, विद्या राणे, प्राचार्य पंकज संते यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com