

-ratchl२८२.jpg-
P२५N५४०८०
चिपळूण ः मानद डॉक्टरेट स्वीकारताना प्रा. अमेय गोडबोले.
---
प्रा. गोडबोले यांना ‘मानद डॉक्टरेट’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः येथील गोडबोले क्लासेसचे संचालक प्रा. अमेय गोडबोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. फरिदाबाद (हरियाना) येथील मॅजिक ॲण्ड आर्ट युनिव्हर्सिटीने तेथील दी कॅस्टल ऑफ आर्ट थिएटर येथे आयोजित केलेल्या मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये इंटरनॅशनल वेलफेअर ह्युमन राईट्स फाउंडेशनचे अध्यक्ष राम शर्मा यांच्या हस्ते त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.
शिक्षण आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मॅजिक ॲण्ड आर्ट विद्यापीठ, फरिदाबाद यांची निवड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. खासगी क्लासेसपैकी मानद डॉक्टरेट सन्मान मिळवणारे प्रा. गोडबोले हे कोकणातील पहिले मानकरी आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मेवाड विश्वविद्यालयाचे माजी संचालक डॉ. एस. के. रोहिल्ला, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डचे चेअरमन आणि प्रसिद्ध जादूगार सी. पी. यादव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.