

54122
ज्योती तोरसकर यांचा
जिल्हा बँकेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः इतिहास अभ्यासक ज्योती तोरसकर यांना ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले ः इतिहास आणि पर्यटन’ विषयात शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. याबद्दल जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सौ. तोरसकर या कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले ः इतिहास आणि पर्यटन’ या विषयात आठ वर्षांपासून संशोधन करीत होत्या. त्यांनी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, सर्वेक्षण आणि संशोधन करून विद्यापीठाकडे आपला शोधप्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या संशोधनाला मान्यता देऊन संबंधित विषयात विद्यावाचस्पती प्रदान केली आहे. इतिहासाबरोबरच पर्यटन दृष्टिकोनातून केलेले जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांचे हे पहिलेच बहुविद्याशाखीय संशोधन ठरले आहे. यामध्ये सौ. तोरसकर यांनी पी.एचडी. मिळविली आहे. त्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.