महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू
Published on

वीजबिल भरणा केंद्र सुटी दिवशीही सुरू
थकबाकीदार ः ३ कोटी ३२ लाख वसुलीचे लक्ष्य
रत्नागिरी, ता. २८ ः मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९), रविवारी (ता. ३०) व सोमवारी (ता. ३१) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यीक व औद्योगिक वर्गवारीतील ३६ हजार ४५९ वीजग्राहकांकडे ५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार ६३६ वीजग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ हजार ८२३ वीजग्राहकांकडे ३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com