

54132
कुडाळात आजपासून रोंबाट,
राधानृत्यासह चित्ररथ स्पर्धा
महायुतीतर्फे नीलेश राणेंचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः कोकणातील रोंबाट आणि राधानृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या (ता.२९) आणि रविवारी (ता.३०) येथे रोंबाट, राधानृत्य आणि चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येथील महायुतीच्या कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदी उपस्थित होते. गुढीपाडव्याला काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत गोव्यातले भव्य देखावे चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. येथील तहसीलनजीकच्या मैदानावर महायुतीला साजेसा असा शिमगोत्सव सोहळा होणार आहे.
श्री. कुडाळकर म्हणाले, ‘आमदार राणेंच्या संकल्पनेतून येथील शिमगोत्सव कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे. उद्या सायंकाळी ७ वाजता या महोत्सव कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. रविवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला हिंदू नववर्षानिमित्त ते शुभेच्छा देतील. यावेळी शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात गोव्यातील खास ४ आकर्षक देखावे दाखल होणार आहेत. शोभा यात्रेची सुरुवात कुडाळ कॉलेज चौक-पोलिस ठाणे-जिजामाता चौक-गांधी चौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत होणार आहे. कुडाळ जिजामाता चौक येथे या रॅलीमध्ये आमदार राणे सहभागी होणार आहेत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.