दापोली-दापोलीत विनापरवाना गुरांची वाहतूक

दापोली-दापोलीत विनापरवाना गुरांची वाहतूक
Published on

दापोलीत विनापरवाना
गुरांची वाहतूक
चौघांवर गुन्हा : तीन गुरे ताब्यात
दापोली, ता. २८ः विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसात ४ संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील बुरोंडी मार्गावरील लालकट्टा परिसरात गुरांची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो काल (ता.२७) रोजी रात्री १०च्या सुमारास एका जमावाने अडवल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना टेम्पो (एमएच-०८-एपी-१५८१) आढळून आला. टेम्पोच्या हौद्यात सुमारे साडेतीन वर्षाचा एक बैल, ७ वर्षाची एक गाय व दोन महिन्याचा एक पाडा आढळून आला.
या गाडीचा चालक देवेंद्र रवींद्र झगडे (रा. गिम्हवणे, तेलीवाडी) यांच्याकडे पोलिसांनी गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का, याची विचारणा केली. त्यावेळी त्याने परवाना नसल्याचे सांगितले. चालकासोबत गोरखनाथ मधुकर शिंदे (रा. शिरखल गाववाडी) व सदानंद विठोबा जाधव, (रा. शिरसोली जाधववाडी) हे होते. त्यांनी ही गुरे करजगाव येथील बागकर यांच्याकडून विकत घेऊन ती वेळवी येथील अमित अशोक मिरगल यांच्याकडे विकण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com