अपघातातील जखमी ग्रामसेवकाचा मृत्यू

अपघातातील जखमी
ग्रामसेवकाचा मृत्यू
Published on

54167

अपघातातील जखमी
ग्रामसेवकाचा मृत्यू
सावंतवाडी, ता. २८ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी येथील बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले तिरोडाचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश कळंगुटकर (वय ५४) यांचा आज पहाटे गोवा मेडिकल कॉलेज, बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील अन्य जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावरही तेथेच उपचार सुरू आहेत.
ग्रामसेवक करंगुटकर हे ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. यात चौघे गंभीर जखमी होते. त्यांना गोवा-बांबुळी येथे दाखल केले होते. दरम्यान, करंगुटकर यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. नाणोस व तिरोडा ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. अपघातातील इतर जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून यात ग्रामपंचायत कर्मचारी अंजली आडारकर यांच्यासह प्रथमेश कदम, समीर मयेकर यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com