

-rat२९p८.jpg -
२५N५४२४५
चिपळूण ः यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.
----
स्मार्टकस अॅबॅकस अॅकॅडमीचे यश
ऑनलाईन गणित स्पर्धा ; १२ राज्यामध्ये आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः स्मार्टकस अॅबॅकस अॅकॅडमीच्या सती खेर्डी शाखेच्या संचालिका व शिक्षिका आराध्या भोसले यांच्यामार्फत नुकतेच खेर्डी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ऑनलाइन माध्यमांचा वापर करून एकाच वेळी जवळपास १२ राज्यांमध्ये झालेल्या या परीक्षांमध्ये या अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत परीक्षेत यश मिळवले.
या अॅकॅडमीचा बक्षीस वितरण समारंभ शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत झाला. ही ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा पुणे येथे झाली. या सेंटरच्या ऑनलाइन स्पर्धेत वेदिका दगडखैर या सती हायस्कूलच्या विद्यार्थिनीने ‘अ’ श्रेणीमध्ये पाच मिनिटे ४० सेकंदात १५० गणिते सोडवत प्रथम क्रमांक पटकावला. मोक्ष चव्हाण या मेरी माताच्या विद्यार्थ्याने सात मिनिटे दहा सेकंदात १५० गणिते सोडवत तृतीय क्रमांक पटकावला. ‘ब’ श्रेणीमध्ये वरदराज पांढरे या गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने सात मिनिटात १४४ गणिते सोडवत तृतीय क्रमांक पटकावला. ऑफलाईन स्पर्धेत विनोद राठोड या सती हायस्कूलच्या विद्यार्थ्याने सात मिनिटात १०० गुण प्राप्त करत ‘ब’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला सती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय वरेकर, अरविंद सकपाळ, चिंचघरीचे सरपंच राजेश चाळके उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.