

-rat२९p१४.jpg -
२५N५४२४२
चिपळूण : नगरपालिकेसाठी प्राप्त झालेले ‘मिनी रेस्क्यु फायर टेंडर’.
---
चिपळूणला ‘मिनी रेस्क्यु फायर टेंडर’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चिपळूण नगरपालिकेसाठी एक मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त झाली आहेत. चिपळूण पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात हे वाहन दाखल झाले आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याची पाहणी करत याची माहिती घेतली. या वेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. हे वाहन अरूंद रस्त्यावर अग्निशमनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच अपघाताप्रसंगी मनुष्य फसला असल्यास त्याची सुटका करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे या मिनी फायर रेस्क्यु टेंडरमध्ये उपलब्ध आहेत. चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते या वाहनाचे पूजन करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे आदी उपस्थित होते.
-------
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.