

-rat२९p२.jpg ः
P२५N५४२०८
चिपळूण ः पालिकेने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर सौरऊर्जेचा प्रकल्प साकारला आहे.
----
सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीजबिल शुन्यावर
चिपळुणातील सांस्कृतिक केंद्र ; तीन महिन्यात १९ हजार ६३१ युनिट वीजनिर्मिती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : चिपळूण पालिकेने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर सौरऊर्जा प्रकल्प साकारला आहे. त्यामुळे पालिकेचे महावितरणचे वीजबिल शुन्यावर आले असून वीजबिलापोटी पालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या छतावर साकारण्यात आलेला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प वरदान ठरत आहे. गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून १९ हजार ६३१ युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहासह पालिकेच्या कार्यालयाची विजेची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या एकूण इमारतींचे वीजबिल शुन्यावर आले असून, लाखो रुपयांची बचत झाली आहे. २००५ पासून विविध कारणांमुळे बंद पडलेले नाट्यगृह २०२४ मध्ये सुरू करण्यात आले; मात्र वातानुकूलित नाट्यगृहाचे कार्यक्रमाचे भाडे पाहता येणारे वीजबिल व अन्य खर्च भागवणे कठीण बनले होते.
पालिकेने सुमारे ६५ लाख रुपये खर्च करून ७० किलोवॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प येथे साकारला. त्यातून ५० लाख रुपये खर्च झाला आहे. जानेवारीपासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला तेव्हापासून यातून १९ हजार ६३१ युनिट वीजनिर्मिती झाली. त्यामुळे पालिकेचे वीजबिल शुन्यावर आले आहे.
--
भाड्यात तीन हजारांची कपात
सौरऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणकडे जात असल्याने पालिकेची गरज भागून राहिलेले वीजपालिकेला उत्पन्नाच्या स्वरूपात मिळत आहे. सांस्कृतिक केंद्रात यापूर्वी व्यावसायिक नाटकांसाठी दहा हजार रुपये भाडे आकारले जात होते; मात्र विजेचा खर्च कमी झाल्यामुळे भाड्यात तीन हजार रुपयाची कपात झाली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.