माने विद्यालयाला टेलिस्कोप संच

माने विद्यालयाला टेलिस्कोप संच
Published on

माने विद्यालयाला
टेलिस्कोप संच भेट
लांजा ः तालुक्यातील आसगे येथील उर्मिला माने विद्यालयाला ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पांचाळ यांचे सुपुत्र शिक्षणप्रेमी संदेश पांचाळ यांच्याकडून टेलिस्कोप संच देणगी म्हणून देण्यात आला. टेलिस्कोपी संचाची किंमत २८ हजार रुपये आहे. त्यांनी शाळेसाठी देणगी म्हणून दिलेल्या टेलिस्कोप संचमुळे विद्यार्थ्यांना अवकाशातील ग्रह, तारे, आकाशगंगा यांचे स्पष्ट निरीक्षण करता येणार आहे. यासह सूर्यप्रकाश किरणे इत्यादी खगोलशास्त्राचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना आता सोयीस्कर होणार आहे. पांचाळ यांनी शाळेला दिलेल्या महत्वपूर्ण देणगीमुळे आसगे पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विजय नारकर, उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, कार्यवाह राजाराम चव्हाण व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका साधना बावधनकर, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार मानले.
---
चार विद्यार्थ्यांची
‘नवोदय’साठी निवड
मंडणगड ः जवाहर नवोदय विद्यालयासाठी तालुक्यातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तालुक्यातील सुमारे तीनशे विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. जिल्हा परिषद शाळा भिंगळोली मराठी या प्रशालेतील नील सुर्वे, स्नेहल गायकवाड, शार्दुल दिवेकर या तीन विद्यार्थ्यांची सहावीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे या प्रशालेचा विद्यार्थी शुभम सांगडे हा निवड झालेला चौथा विद्यार्थी आहे. हे चारही विद्यार्थी सध्या पाचवीत शिकत असून, त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाचे निवड चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होऊन घवघवीत यश मिळवले आहे. जि. प. शाळा भिंगळोली येथील यशस्वी विद्यार्थ्यांना बारगजे, क्षीरसागर, कोबनाक, पंदीरकर, चांदीवडे, गावडे, फुंदे यांनी मार्गदर्शन केले.
---
शहानुर बाबा यांचा
अलोरेत आज उरुस
चिपळूण ः अलोरे येथील शहानूर बाबा चिश्ती यांचा उरुस ३१ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. अलोरे परिसरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. उरुस महोत्सवामध्ये संदल, मिरवणूक तसेच साहसी खेळ (दानपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ इ.) तसेच मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com