‘महावाचन उत्सवा’त यश सावंत चमकला

‘महावाचन उत्सवा’त यश सावंत चमकला
Published on

54268

‘महावाचन उत्सवा’त
यश सावंत चमकला
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेचा चौथीतील विद्यार्थी यश सावंत याने समग्र शिक्षा विभागामार्फत आयोजित महावाचन उत्सव २०२४ मध्ये तिसरी ते पाचवी या गटातून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश प्राप्त केले. त्याच्या यशाबद्दल समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्गद्वारे त्याला सन्मानित करण्यात आले. बालवयातच आपल्या अष्टपैलूपणाची चुणूक दाखवणाऱ्या यशने वाचनासोबत कथाकथन, वक्तृत्व, चित्रकला, बुद्धिबळ, पोवाडा गायन आदी कला, क्रीडा व अनेकविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. यशच्या या यशाबद्दल सिं. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com