ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साळिस्ते शाळेचा गौरव

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साळिस्ते शाळेचा गौरव
Published on

54283

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे
साळिस्ते शाळेचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता.३० : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळिस्ते क्र. १ शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सरपंच प्रभाकर ताह्मणकर यांनी कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्गतर्फे शाळेतील शिक्षकांचा व केंद्रप्रमुखांचा विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष वामन ताह्मणकर, सदस्य व माजी सरपंच राधाबाई गुरव, सदस्य सुरेश साळिस्तेकर, ज्येष्ठ नागरिक संघ तळेरे अध्यक्ष सुरेश पाटणकर यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांना आदर्श शिक्षक, पदवीधर शिक्षिका संजना ठाकूर यांना विशेष राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. उपशिक्षिका माधवी बुचडे यांचा ‘एलएफडब्ल्यू’ या इंग्रजी स्पर्धा परीक्षेतील उत्तम कार्याबद्दल तसेच उपशिक्षिका संगिता वळवी यांचा रंगोत्सव स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल सत्कार केला. मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे पालकांनी कौतुक केले. उपसरपंच जितेंद्र गुरव, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गजानन रामाणे, शिक्षणप्रेमी संतोष पाष्टे, सदस्य प्रशांत बारस्कर, सचिन ताम्हणकर, चंदूशेठ हरयाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com