

54325
स्वधर्मरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी
नीलेश राणे ः कुडाळात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता.३० ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले, हे विसरून चालणार नाही. आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले.
बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून ‘धर्मवीर ज्वाला’ कुडाळ येथे दाखल होताच आमदार राणे यांनी अभिवादन केले. त्यानंतर राजमाता जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, गणेश भोगटे तसेच राजू राऊळ, विवेक पंडित, रमा नाईक, वैद्य सुविनय दामले आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मासाठी सतर्क राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ एक दिवस रॅली काढून चालणार नाही, तर सातत्याने धर्मासाठी सतर्क राहणे काळाची गरज आहे. भर दिवसा गोहत्या होत आहेत. अशा प्रकारांवरही लक्ष दिले पाहिजे. ते अंगावर येत आहेत, तर आपणही त्यांना प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. त्यांच्याजवळ अनेक देश आहेत; पण आपल्याजवळ हिंदू राष्ट्र म्हणून एकच आहे. त्यामुळे आपला धर्म जगला पाहिजे. त्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.