सदर

सदर
Published on

वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
(१७ मार्च टुडे ३)
कचरा आणि पाणी या दोन्ही अतिमहत्त्वाच्या गोष्टीं दुर्दैवाने दुर्लक्षित आहेत. कचरा नियोजन आणि पाणी नियोजन या गोष्टी आपल्या जीवनातून वजा केल्या तर आपले जीवन संपून जाईल. याची नांदी आपण केली आहे. कचरा आणि पाणी नियोजनात प्रत्येक नागरिकाचा सहभाग नसल्यामुळेच आज दोन्ही प्रश्नांनी गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.
- rat३०p१०.jpg-
25N54350
- प्रशांत परांजपे, दापोली
---
कचरामुक्त मी होणार का?
सामान्य नागरिकाला वाटतयं, की ही कामे माझी नाहीत. ती ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि घरातील स्त्रीयांची आहेत. प्रथमतः सर्वांनी या गैरसमजातून बाहेर येणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जे नागरिक सुशिक्षित आहेत ते घरातील कच-याचे आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करतात. परंतु हे प्रमाण समुद्राच्या पाण्यातून पेलाभर पाणी घेण्याइतके अल्प आहे.
कचरा मुक्त मी या संकल्पनेनुसार; प्रथम कचरा आणि स्वच्छ, प्रदुषित नसलेले पाणी ही माझी जबाबदारी आहे याची जाणीव करून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने शाळेतील परिपाठ आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण येथे स्वच्छता या विषयाची परिपूर्ण माहिती दिली जाते. विद्यार्थी त्याचे अनुकरण तंतोतंत शाळेच्या आवारात करतात. मात्र तेथून बाहेर पडल्यावर त्यांच्यावर घरातील पालकांचा प्रभाव सुरू होतो. अनेकदा तो चुकीचा पडल्याने विद्यार्थी शाळेच्या बाहेर सर्वत्र अस्वच्छता करतो. पुढील दोन उदाहरणे पाहिल्यावर ही बाब लक्षात येईल. एका शाळेत घनकचरा व पाणी व्यवस्थापन या विषयावर बालक व पालक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वसुंधरा स्वच्छतेबाबत अनेक युक्तीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. सर्वांनी आजन्म माझ्याकडून या भूमीवर कोठेही कचरा होणार नाही याची शपथ घेऊन कार्यशाळेचे सांगता झाली आणि तिसऱ्याच दिवशी याच शाळेतील विद्यार्थी शाळेत येताना शाळेजवळ नदीत कचरा फेकताना कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून आलेल्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी पाहिले. त्या विद्यार्थ्याला प्रेमाने बोलवून दोन प्रश्न विचारले, दोन दिवसापूर्वी शाळेत झालेल्या कार्यशाळेला तू होता का? आणि तुझे कोण पालक आले होते? यावर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हो आणि दुस-या प्रश्नाचे उत्तर नाही आले. इतकच नाही तर अधिक माहिती त्या विद्यार्थ्यांने दिली त्यानुसार इयत्ता तिसरी पासून तो शाळेत चालत एकटा येऊ लागला. बाबा रोज मला ही कचऱ्याची पिशवी देतात आणि शाळेत जाताना नदीत टाकायला सांगतात. येथेच पालकनिती चुकलेली लक्षात येते. ते पालक शाळेत परिपाठ किंवा कार्यशाळेला आले नव्हते. शिवाय विद्यार्थी हा सांगकाम्या झाल्याने शाळेत शिक्षकांनी सांगितले की चॉकलेटचा कागदही जमिनीवर पडता नये, त्याचे पालन तो शाळेत करतो, आणि पालकांच्या सुशिक्षितपणाच्या अभावामुळे नदी अर्थात जल प्रदूषणाला तोच विद्यार्थी कारणीभूत ठरतो.
दुसरे उदाहरण एसटी स्थानकावरील...फलाटावर बस नुकतीच लागली असता पहिल्या बाकड्यावर आपल्या पाल्यासहीत ऐटीत एक पालक विराजमान होतात आणि क्षणात घरून आणलेली कचरा भरलेली प्लास्टीकची कायद्याने बंदी असलेली काळी प्लास्टीक कॅरीबॅग बसच्या खिडकीतून अलगद स्थानकावर टाकतात. तेथे उभ्या असलेल्या स्वच्छताप्रेमीच्या ही गोष्ट लक्षात येते...ते स्वच्छता प्रेमी आधि सामान्यस्वरात आणि सांगणे ऐकत नाही म्हटल्यावर कडक शब्दात त्या पालकाला सुनावतो व बसस्थानकावर टाकलेली कचऱ्याची पिशवी उचलण्यास भाग पाडतो. हे सर्व तो पाल्य पहात असतो आणि नोटीस करतो की आपले बाबा चुकीचं वागल्याने त्यांना ओरडा मिळाला व परत कचरा उचलणे भाग पडले. यामुळे वडीलांनी प्रेमापोटी बाबांना कोणी बोलल्याचा त्या चिमुकल्याला रागही आला असेल किंवा काय बाबा तुम्ही असा प्रश्न ही मनात घोंगावू गेला असेल. वरील दोन्ही घटनांमध्ये पालकनीती चुकली आहे.
वरील दोन्ही गोष्टी प्रातिनिधिक आहेत. परंतु याचे प्रमाण अतिप्रचंड आहे. या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. कचरा कोणी केला आणि प्रशासन ढिम्म आहे काही करीत नाही असा डंकाही पान खाऊन रस्त्यावर पचकन पिचकारी टाकणारा कोणी बोलून जातो. मानसिकतेत बदल जो पर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कचरा प्रश्नाला विनाकारण गोंजारत बसणार आहोत. माझा कचरा आणि पाणी ही माझी जबाबदारी आहे. याची जाणीव होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत काही बहुमजली इमारतींच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर नियोजनाचा अभाव, मला काय करायचय आणि कचरा आणि सांडपाणी नियोजन ही कामे माझी नाहीत ती प्रशासनाची आहेत. आम्ही वाटेल तसा आणि वाटेल तेथे कचरा करू आणि सांडपाणी सोडू. ही मनोवृत्ती असल्याने काही ठिकाणी सांडपाण्याचे तुंबलैले नाले, दुर्गंधी आणि ओघाने रोगराई हे दुर्दैवी चित्र दिसते आहे.
हे सर्व टाळण्यासाठी कचरा मुक्त मी अभियान आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाकरीता मर्यादित पण प्रत्येकाने केले तर एका रविवारी अवघा जिल्हा, राज्य आणि देशही स्वच्छ सुंदर होऊ शकतो आणि सातत्याने रोज स्वतःच्या कुटुंबासाठी कचरा नियोजन आणि पाणी (पिण्याचे, बागायती व सांडपाणी) नियोजन करण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे दिली तर ही एकदा केलेली स्वच्छता तहहयात राहू शकते.
ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करा आणि सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवा. या बाबत सूक्ष्म नियोजनाच्या माहितीकरता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठान या कचरा नियोजनात अग्रेसर असलेल्या सेवाभावी संस्थेकडे संपर्क करून कचरा मुक्त मी आणि माझे कुटुंब अशी पाटी घरावर अभिमानाने लावा.

(लेखक कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक मुक्तीसाठी काम करतात.)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com