

54401
गुढीपाडवा शोभायात्रेस
तळेरेत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील सकल हिंदू समाज पंचक्रोशी कासार्डे, तळेरे यांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा आज सकाळी उत्साहात काढण्यात आली.
या शोभायात्रेचे तिसरे वर्ष असून, कासार्डे तिठा येथून शोभायात्रा निघून तळेरे बाजारपेठमार्गे तळेरे एसटी बसस्थानकासमोरील रंगमंचावर नववर्षाच्या जल्लोषात घोषणा देत समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत सर्वात पुढे भगवा धर्मध्वजाच्या नेतृत्वाखाली लहान मुले, पुरुष व महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान करून सहभाग घेतला. कासार्डे तिठा येथून भव्य शोभायात्रा निघाली. यावेळी संपूर्ण परिसर हिंदू नववर्षाच्या जयघोषाने दणाणून सोडला. महिला व पुरुषांनी पारंपरिक पोषाख परिधान करून लक्ष वेधून घेतले. कासार्डे, तळेरे पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, लहान मुलांसह वयोवृध्दांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्यांचा व सहभागी सर्वांचे आभार मानत तळेरे बसस्थानकासमोरील रंगमंचावर समारोप करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.