

54402
कबड्डी स्पर्धेत ‘पंचक्रोशी जामसंडे’ विजेता
तळेरेतील जिल्हास्तरीय स्पर्धा; लक्ष्मीनारायण वालावल संघाला उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० ः तळेरे-वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे संघाने विजेतेपद पटकावले. लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रिया चव्हाण, माजी सरपंच प्रवीण वरुणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ही स्पर्धा तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कबड्डी मैदान येथे पार पडली.
या स्पर्धेतील विजेत्या पंचक्रोशी जामसंडे संघाला रोख ११ हजार १११, उपविजेत्या लक्ष्मीनारायण वालावल संघाला रोख ७ हजार ७७७ आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय आणि चतुर्थ भोगलेवाडी आणि यंगस्टार कणकवली संघाला प्रत्येकी ३ हजार ३३३ व चषक देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट पकड मकरंद पाटकर, उत्कृष्ट चढाई विशाल मयेकर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशील पाटकर यांना प्रत्येकी ५०१ व चषक देऊन गौरविण्यात आले.
या बक्षीस वितरण सोहळ्याला (कै.) सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राजू वळंजू, मुंबई येथील संजय जगताप तसेच तळेरे वाघाचीवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, नीलेश सोरप, दादा तळेकर, श्री. झोरे, एस. कदम, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, युट्युबचे गुरु पाताडे, संदीप साळुंखे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.