

कावितळीत गटाराचे पाणी रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः शहरातील काविळतळी येथील परांजपे स्कीममधून येणारे गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येते. तसेच बीएसएनएलच्या तिथे गटार असून, त्या गटारातून पाणी जात नसल्याने तुडूंब भरले जाते. तेथून पाण्याला जाण्यासाठी कुठेही मार्ग नाही. ते पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गाळ्यांमध्ये जात आहे. याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून पाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पालिका प्रशासनाकडे गेली दोन वर्षे सातत्याने त्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जात असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळा तोंडावर आला की, आम्ही करतो असं सांगितलं जातं; परंतु तसं काही होत नाही. सतत पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत. रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे अरूंद आहेत आणि काही ठिकाणी तर गटारे दिसतही नाहीत. त्यामुळे काविळतळी भागातील लोकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या संदर्भात मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले आहे. त्यांनी पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. पंधरा दिवसात काम न झाल्यास येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदन देताना काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव, मुक्ता परांजपे, सुप्रिया कवितके, अब्बास भाई, दिनीश भाई, असलम शेख, घाग, कासकर, शुभम कारंडे आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.