

युवतीचा विनयभंग, दोघे अटकेत
खेड ः जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे (वय २८), सूरज सुरेश पाटील (वय १८) या दोघांना येथील पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. दोघांनाही गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२४पासून आतापर्यंत घडल्याचे पीडित युवतीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडित युवतीशी ओळख झाल्यानंतर वर्षभरापासून त्यांचे बोलणे व गाठीभेटी सुरू होत्या. या दरम्यान, दोघांनीही विनयभंग करत अश्लील वर्तन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांवर विनयभंगासह ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत रात्री उशिरा दोघांवर येथील पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या दोन्ही संशयितांचे मोबाईलही पोलिसांनी जप्त केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.