संगमेश्वर कुणबी समाजाचा होणार विस्तार

संगमेश्वर कुणबी समाजाचा होणार विस्तार
Published on

-rat२८p१०.jpg-
KOP२५N५४०२३
सावर्डे : आमदार शेखर निकम यांचे पुष्पगुच्छ घालून आभार मानताना कुणबी बांधव.
-----
कुणबी समाजभवनाचा होणार विस्तार
आमदार निकम यांचा पाठपुरावा; ५० लाख मंजूर
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३० ः आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर येथील कुणबी भवनाच्या विस्तारीकरणासाठी ५० लाखांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. त्याबद्दल संगमेश्वर कुणबी समाजाच्यावतीने सावर्डे येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात शिववैभव पतसंस्थेचे सचिव संतोष थेराडे यांनी आमदार शेखर निकम यांचा सत्कार केला.
समाजभवनासाठी सर्व मदत करण्याचा शब्द आमदार निकम यांनी कुणबी समाजाला दिला होता. त्याची पूर्तता त्यांनी केली. अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निकम यांच्या मागणीची पूर्तता करून कुणबी भवनासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला. आमदार निकम यांनी कुणबी भवनाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. भवनाच्या बांधकामाविषयी आवश्यक सूचना दिल्या. या भवनाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम यांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी राजेंद्र सुर्वे, नाना कांगणे, सुशील भायजे, कृष्णा हरेकर, दत्ता ओकटे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com