

रत्नागिरीत उद्या महासत्संग सोहळा
रत्नागिरी, ता. ३० : दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या सान्निध्यात विश्वशांती तसेच देश, धर्म आणि समाजाच्या हितासाठी रत्नागिरीत मंगळवारी (ता. १ एप्रिल) राष्ट्रीय महासत्संग सोहळा आयोजित केला आहे.
रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथील स्टेट बँक कॉलनी जवळील नवीन ट्रक वाहन तळ मैदानावर हा आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे. महासत्संग सोहळ्यानिमित्त याच मैदानावर १ एप्रिलला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत विश्वशांतीसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामूहिक पारायण आणि त्यानंतर कोकणच्या समृद्धीसाठी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजनाची सेवा होईल. या दोन्ही सेवा झाल्यानंतर समस्त सेवेकऱ्यांच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा देखील साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज होईल. महासत्संग व अध्यात्मिक सेवेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.