

-rat३०p९.jpg-
२५N५४३५८
संगमेश्वर ः शास्त्री पुलाचे सुरू असलेले काम.
----
बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पूल रखडले
आरवली ते बावनदी चौपदरीकरण ; खड्डे, धूळ, वेड्यावाकड्या वळणामुळे अपघात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील अपघात प्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडलेले आहे. आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रात संगमेश्वर ओझरखोल ते तुरळ या पट्ट्यातील चौपदरीकरण कुर्म गतीने सुरू आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली असून वाहनचालकांचा नाहक बळी जात आहे.
कच्च्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. महामार्गाचे काम सुरू होण्यापुर्वी भूमिपूजन झालेल्या बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पुलांचेही काम अजून संथगतीने सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर शास्त्री पूल, सोनवी पुलाजवळ धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच बनवण्यात आलेले जोड रस्ते ही धोकादायक बनलेल्या आहेत अनेक वेळा याच ठिकाणी अपघात घडत आहेत. अपघात प्रवाह क्षेत्रामध्ये धोकादायक वळणे अजूनही हटवण्यात न आल्याने त्या ठिकाणी पूर्वीसारखी अपघात घडत आहेत. संगमेश्वर पैसाफंड हायस्कूलच्या समोर खड्डयांकडे वारंवार सांगूनही ठेकेदार अजूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे .
पावसाळी ब्रेकनंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संगमेश्वर दरम्यान रखडलेले आहे. या कामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदी सोनवी कोळंबे या पूलांची कामे संथ गतीने सुरू आहे त्यामुळे अर्धा तासाच्या प्रवासाला दोन ते तीन तास प्रवास वेळ लागत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
----
धुळीचा वाहनचालकांना त्रास
मोठ्या वाहनांमुळे सिमेंट अथवा खड्ड्यात टाकलेल्या खडीची धूळ मोठ्याप्रमाणात परिसरात पसरत असून धुळीमुळे संसर्गजन्य रोगांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला बदलते वातावरण आणि त्यामुळे बसणारा फटका त्या दुसऱ्या बाजूला धुळीचे लोट यामुळे संगमेश्वरवाशियाना त्रास सहन करावा लागत आहे.
---
(पोटात घ्यावी)
डिसेंबरपूर्वी बहुतांश कामे होतील पूर्ण
चिपळूण, ता. ३० ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून कामाला गती देण्याबरोबरच अन्य कामेही लवकरच पूर्ण गेली पाहिजेत, अशी कल्पना ठेकेदाराला स्पष्ट भाषेत द्या अशी सूचना आमदार निलेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी (ता. २९) चिपळूण येथे आमदार नीलेश राणे यांनी महामार्गाच्या कामाची माहिती घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपरीकरण व्हावे, यासाठी नीलेश राणे यांनी खासदारकीच्या कालखंडात केंद्र शासनाकडे मागणी केली होती. त्यांनी तसा पाठपुरावाही केला होता. या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आमदार निलेश राणे यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला व श्री. खुणेकर यांनी डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. बैठकीवेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, सुधीर पानकर, अभिषेक जागुष्टे, हरिश्चंद्र रहाटे, शौर्य निमकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.