समन्वय समिती अध्यक्षपदी मुल्ला, सचिवपदी सागर पाटील

समन्वय समिती अध्यक्षपदी मुल्ला, सचिवपदी सागर पाटील
Published on

आयुब मुल्ला समन्वय समिती अध्यक्षपदी
माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना ; १३ संघटनांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीची नुकतीच माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये समन्वय समितीच्या कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात आली. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला यांची तर सचिव पदी माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली.
जिल्हा समन्वय समितीमध्ये सहभागी असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावरील सर्व १३ संघटनांचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव यांचा समावेश समन्वय समितीमध्ये करण्यात आला आहे. समितीमधील अन्य पदाधिकारी असे ः प्रदीप वाघोदे (उपाध्यक्ष, कास्ट्राईब संघटना), संदीप कांबळे (शिक्षक सेना), संजय पाथरे (शिक्षक भारती), ज्ञानेश्वर शिंदे (शिक्षक परिषद), रामचंद्र केळकर (शिक्षकेतर कर्मचारी संघटना), शिरिष कुमार भालशंकर (खजिनदार कास्ट्राईब संघटना), बी. आर. पाटील (सह खजिनदार, उच्च माध्यमिक संघटना), लक्ष्मण गोरे (चतुर्थी कर्मचारी संघटना), आनंद त्रिपाठी (सहसचिव, शिक्षण क्रांती संघटना), सुनील जोपळे (आफ्रोड संघटना), शौकत महाते (उर्दू संघटना), विवेक महाडिक (ग्रंथपाल संघटना), इम्तियाज काझी (प्रयोगशाळा सहाय्यक संघटना) यांचा समावेश आहे. सदस्यपदी महेश पाटकर, रोहित जाधव, एस.एन कांबळे, प्रकाश पांढरे, सुनील जाधव, निलेश कुंभार, पांडुरंग पाचकुडे, दिलीप जाधव, राकेश मुंडे, आशिष सरफरे, राहुल सप्रे, सुलेमान तडवी, अमोल लिंगायत, दिनेश वेताळे व अजमल मुल्ला यांचा समावेश आहे.
-----
दापोलीत राज्यस्तरीय अधिवेशन
दापोली येथे होऊ घातलेल्या मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com