बापूसाहेब, शिवरामराजेंवर लवकरच माहितीपट

बापूसाहेब, शिवरामराजेंवर लवकरच माहितीपट
Published on

54428

बापूसाहेब, शिवरामराजेंवर लवकरच माहितीपट

युवराज लखमराजे भोसले : नववर्षानिमित्त सावंतवाडीत अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० : येथील संस्थानचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज आणि पुण्यश्लोक शिवरामराजे महाराज यांच्या तलावाकाठी असलेल्या पुतळ्यांची डागडुजी व रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर युवराज लखमराजे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी संस्थानचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या दोन्ही महाराजांच्या कार्यपद्धतीवर आधारित माहितीपट लवकरच तयार करणार असल्याची घोषणा केली.
यावेळी युवराज लखमराजे भोसले यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचेही कौतुक केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले की, नगरपरिषदेकडून अनेक वर्षांपासून या दोन्ही पुतळ्यांची देखभाल व्यवस्थित झाली नव्हती. याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत पुतळ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला यापुढे तरी या दोन्ही पुतळ्यांची योग्य देखभाल करण्याची विनंती केली. याप्रसंगी सावंतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या कार्याचा इतिहास वाचून दाखवला आणि त्यांना ‘रामराजे’ असे संबोधले. युवराज लखमराजे आणि श्री. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. लक्ष्मण कदम यांनी विनामूल्य रंगरंगोटी केली, तर विद्यार्थिनी श्रावणी तळवणेकर हिने सुंदर रांगोळी काढली. याबद्दल युवराज यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, लक्ष्मण कदम, शिल्पकार काका सावंत, काका मांजरेकर, सुवर्णकार बाळा चोनणकर, छायाचित्रकार अनिल भिसे, श्रावणी तळवणेकर, राम वाडकर, दत्तप्रसाद गोठसकर, सचिन सावंत, प्रा. डॉ. देविदास बोर्डे, सचिन देशमुख, डॉ. यू. एल. देठे, प्रा. आर. बी. शिंत्रे, सी. ए. नाईक, प्रा. डॉ. वाय. ए. चौधरी, डॉ. प्रा. एस. वि. पाटील, प्रा. आर. के. शेळके, आर. जी. कुराडे, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com