

-rat३०p११.jpg-
२५N५४३९६
संगमेश्वर ः गुढीपाडव्यानिमित्त बुरंबी टाकेवाडी येथील मुलांनी घरोघरी नेलेल्या पालखीचे सुहासिनीने औक्षण करून स्वागत केले.
---
लहान मुलांनी जपली पालखीची परंपरा
संगमेश्वर, ता. ३० ः शिमगोत्सवात मोठी मंडळी ग्रामदेवतेची सेवा कशी करतात यावर बारीक लक्ष ठेवून गावातील छोटी मुलं गुढीपाडव्याला छोटी पालखी घरोघर फिरवून मोठेपणी आम्ही ग्रामदेवतेच्या सेवेत कोठेही कमी पडणार नाही, याची जणू हमीच यातून देतात. कोकणच्या अनेक गावातून आज बालभक्तांची पालखी घराघरातून नेण्यात आली. परंपरा जपण्याचा छोट्या मुलांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद म्हटला पाहिजे .
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी टाकेवाडी या गावात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छोट्या मुलांची पालखी ग्रामदेवतेच्या जयजयकारात गावातून फिरवण्यात आली. बुरंबी टाकेवाडी येथील जवळपास १५ ते २० मुलं विशेष म्हणजे छोट्या मुलींसह सकाळी मंदिरात एकत्र आली. पालखीत प्रतिकात्मक मूर्ती ठेवून ग्रामदेवतेच्या जयजयकाराने प्रार्थना करुन पालखी ढोल ताशांच्या गजरात, भगव्या निशाणासह गावातील प्रत्येक घरात नेली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.