ओम गोतावडेचे प्रज्ञाशोधमध्ये यश

ओम गोतावडेचे प्रज्ञाशोधमध्ये यश
Published on

ओम गोतावडेचे प्रज्ञाशोधमध्ये यश
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील कोंडीवळे-गोतावडेवाडी शाळेतील चौथीमधील विद्यार्थी ओम गोतावडे हा प्रज्ञाशोध परीक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम आला आहे. तसेच दिव्या गोतावडे व प्राची गोतावडे या मुलींनीही तालुक्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. मुख्याध्यापिका मुग्धा कुळ्ये व सहकारी शिक्षिका आरती देसाई यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले होते. शाळेच्या इतिहासात प्रथमच असे यश मिळाले आहे. सरपंच रविकांत मटकर, मंदरूळ केंद्रप्रमुख सोगम, पालकांनी या तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

‘शाळेतच शारीरिक फिटनेसचे धडे मिळावेत’
रत्नागिरी ः शाळेतच शारीरिक फिटनेसचे धडे मिळणे गरजेचे आहे. बदलत जाणाऱ्या लाईफस्टाईलचा परिणाम सर्वच स्तरांवर होताना दिसत असून, नवीन पिढी लठ्ठ, अनफिट होत असून त्यातून अनेक समस्या तयार होत आहेत. शहरी भागात अनेक शाळा-महाविद्यालयांसाठी क्रीडांगणे नसल्याने खेळाचा तास असूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक फिटनेसविषयी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून शालेय अभ्यासक्रमात ५० गुणांसाठी थेअरी व ५० गुणांसाठी प्रॅक्टिकल असा १०० गुणांचा समावेश करावा, अशी मागणी येथील जाधव फिटनेसचे डायरेक्टर हेमंत जाधव यांनी ॲकॅडमी अध्यक्ष आमदार किरण सामंत यांच्यामार्फत पालकमंत्र्यांकडे केली आहे. नवीन तयार होणारी पिढी सुदृढ व निरोगी होणार असून, क्रीडाक्षेत्रात चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. ही अकॅडमीची मागणी दोन्ही बंधू विधानसभेत मांडणार असून, त्यावर समिती तयार करून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com