झाराप शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी धुरी

झाराप शिक्षण प्रसारक
मंडळ अध्यक्षपदी धुरी
Published on

झाराप शिक्षण प्रसारक
मंडळ अध्यक्षपदी धुरी
कुडाळ ः शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी (साळगाव) या संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद धुरी, तर सचिवपदी प्रदीप प्रभूतेंडोलकर यांची निवड करण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयात झाली. यात पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यातून पदाधिकारी निवडीची बैठक कार्यकारी संचालक सतीश साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सर्वानुमते अध्यक्ष मुकुंद धुरी, तर सचिवपदी प्रदीप प्रभूतेंडोलकर यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष भास्कर परब व दुय्यम सचिव रमाकांत धुरी, कार्यकारी संचालक मांडकुलकर, ज्ञानदेव चव्हाण, पद्माकर धुरी, देवेन प्रभूतेंडोलकर, दशरथ राऊळ, शांताराम धुरी, तुकाराम गोडे, उच्च माध्यमिक विद्यालयात प्रदीप प्रभूतेंडोलकर, जयवंत पेडणेकर यांची निवड करण्यात आली. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार उपस्थित होते.
--
ग्रामपंचायत कर्मचारी
कारवाई धोरण निश्चित
कणकवली ः ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांबाबत दंड, निलंबन किंवा बडतर्फ करण्यात आल्यास याविरुद्ध अपिल व पुनरिक्षण अर्ज निकाली काढण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कर्मचार्‍यांना दंड, निलंबन किंवा बडतर्फीबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनी अपिल प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांत निकाली काढावे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील झाल्यानंतर त्यांनीही ४५ दिवसांत ते निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com