विल्येत आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन

विल्येत आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
Published on

स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिन आज विल्येत
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोमवारी (ता. ३१) मोठ्या भक्‍तिभावाने साजरा होणार आहे. स्वामी समर्थप्रेमी भाविकांना विल्ये येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक व स्वामी सेवक संजय आदिवांत व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराज दर्शनाचे दालन उपलब्ध करून दिले आहे. श्री शंकराचार्य (करवीर पीठ, कोल्हापूर) यांच्या हस्ते संस्थानिकांच्या सहकार्याने आणि भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचा लोकार्पण झाला होता. सर्व भाविकांनी स्वामी सेवेचा आनंद घ्यावा. दुपारी महाप्रसाद होणार आहे. परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी सेवक व मंदिर विश्वस्त संजय आदिवांत व कुटुंबीयांनी केले आहे.

सफाई कामगारांसाठी
आरोग्य शिबिर
चिपळूण : पालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी पायाभूत स्वच्छता प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मान फाउंडेशन यांच्या विद्यमाने येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हे शिबिर झाले. मुख्याधिकारी विशाल भोसले, मान फाउंडेशनच्या संचालिका डॉ. स्मिता सिंग, उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, मिळकत विभागप्रमुख सागर शेडगे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव आदी उपस्थित होते. सफाई कामगारांना सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य देऊन त्यांचा सन्मान केला.

गुणवंतांचा सत्कार
चिपळूण : येथील कामगार कल्याण केंद्रामार्फत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शिष्यवृत्तीसाठी कामगार पाल्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यात सावंतवाडी येथील वेदिका संजय ताटे, चिपळूण येथील सई सुदेश घोडे, पार्थ संतोष चव्हाण, कुडाळ येथील फाल्गुणी सतीश गोवेकर, रत्नागिरी येथील आयुष अभय आगवेकर यांच्यासह गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, विविध आस्थापनांतील ४२ कामगार व कुटुंबीयांना गंभीर आजार उपचार अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ९ लाख ४० हजार रुपये एनएफईटीद्वारे वितरित करण्यात आले. प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com