पाडव्याच्या मुहूर्तावर ७६ हजार पेटीत वाशीत

पाडव्याच्या मुहूर्तावर ७६ हजार पेटीत वाशीत
Published on

(हापूसचा फोटो वापरावा)

पाडव्याच्या मुहूर्तावर ७६ हजार पेटीत वाशीत
गतवर्षीपेक्षा आवक कमी ; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर यंदा वाशी येथील बाजार समितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहिली आहे. यंदा दोन दिवसात ७६ हजार पेटी रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. गतवर्षी याच कालावधी लाखाहून अधिक पेट्यांची आवक होती. त्यामुळे यंदा पेटीचा दर २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. अनेक ग्राहकांनी पाडव्याचा मुहुर्त साधण्यासाठी अवघे अर्धा डझन आंबे खरेदी केले होते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. कोकणातील बागायतदार व्यावसायीक आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी नियोजन करत आले आहेत. मात्र यंदा निसर्गांने बागायतदारांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे यावर्षी मोहोर येण्यास विलंब झाला. त्याचा परिणाम पुढे उत्पादनावर झाला. पहिली पेटी फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यात बाजार गेली असली तरीही या महिन्यातील आवक अत्यल्प होती. गेल्यावर्षी हापूसचा हंगाम चार महिने म्हणजेच सुमारे १२० दिवस चालला. यंदा मार्च महिन्यात आवक सुरू झाली. सध्याची परिस्थिती पाहता यंदा १० मे पर्यंतच हंगाम राहणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे ६० ते ७० दिवसच बाजारात हापूसची आवक राहील. मागील आठवड्यात कोकणात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात उष्मा वाढल्याने आंबा काढणी योग्य होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली होती. शनिवारी (ता. २९) ३६ हजार पेटी कोकणातून वाशी बाजारात पाठविण्यात आल्या, तर रविवारी (ता. ३०) प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी ४० हजार पेटींची आवक झाली. दोन दिवसात मिळून सुमारे ७६ हजार पेटींचा आवक झाली.
हापूसचे उत्पादन कमी राहिल्याने यावर्षी पाच ते आठ डझनच्या पेटीचे दर २ हजार ते ५ हजार रूपये इतके आहेत. गतवर्षी हाच दर १५०० ते ४ हजार रूपये होते. ५०० ते २ हजार रूपयांचा फरक यंदा दिसत आहे. दर्जेदार आंब्याचा दर पेटीला ५ हजार मिळत असल्याने काही बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतू दुबईमध्ये ईद साजरी करण्याचा उत्साह असल्याने मार्केट शांत आहे. त्याचा परिणाम आंब निर्यातीवर होत असल्याची चिंता वाशीतील व्यावसायिक अशोक हांडे यांनी व्यक्त केली.
------
कोट
वाशी बाजारसमितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. यंदाचा हंगामही कमी दिवसांचा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही स्थिर राहतील.
- संजय पानसरे, वाशी बाजारपेठ
----
अमेरिकेतील निर्यांत आजपासून सुरू
दुबई, लंडनसह अमेरिकेमध्ये हापूसची निर्यात आजपासून सुरू झालेली आहे. निर्यात सुरू झाली तर वाशी बाजारात हापूसच्या पेट्या पडून राहणार नाहीत. तसेच दरही स्थिर राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com