‘कोलझर’वर गणेश पॅनलची सत्ता

‘कोलझर’वर गणेश पॅनलची सत्ता
Published on

54487


‘कोलझर’वर गणेश पॅनेलची सत्ता

दहाही जागांवर विजय; सोसायटीच्या पहिल्याच निवडणुकीत बाजी

सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ३० ः येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत श्री गणेश सहकार पॅनेलने सर्व दहाही जागा जिंकत मोठा विजय मिळवला. ही निवडणूक काल (ता.२९) झाली.
या सोसायटीच्या कार्यक्षेत्रात कुंब्रल, कोलझर आणि शिरवल अशी तीन गावे येतात. आतापर्यंत या सोसायटीची कार्यकारिणी निवड बिनविरोध होत होती. यावेळी भाजप प्रणित समृद्धी पॅनेल व सर्वपक्षीय श्री गणेश पॅनेल यांच्यात लढत झाली. काल सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी उशिरा मतमोजणी पार पडली. यात गणेश पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. यात रामचंद्र शंकर बोंद्रे, तातोबा ऊर्फ सुदेश वामनराव देसाई, उल्हास आबा देसाई, हनुमंत रामा धुरी, सूर्याजी बाबाजी नांगरे, प्रवीण बाबली परब, विलास सखाराम सावळ, विकास रामचंद्र सावंत, कृतिका किशोर देसाई, विशाखा विलास देसाई यांचा समावेश आहे. विजयी उमेदवारांचे शिवसेना पदाधिकारी गणेशप्रसाद गवस यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक सामाजिक संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
----
‘संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करू’
नवनिर्वाचित संचालक सुदेश देसाई म्हणाले, ‘मतदारांनी आम्ही केलेल्या सकारात्मक आवाहनाला साथ दिली. त्यांनी भरभरून मते दिली आहेत. त्याबद्दल त्यांचे त्रिवार आभार. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. सर्व सभासदाचे हित जपण्याबरबोरच सगळ्यांना सोबत घेऊन संस्थेचा विकास साधण्याचा पुढच्या काळात प्रामाणिक प्रयत्न करू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com