

लक्ष्मीनागरी पतसंस्थेस ५० लाख नफा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : येथील श्री लक्ष्मीनागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपला वार्षिक ताळेबंद जाहीर केला आहे. पतसंस्थेतील थकबाकीदारांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा यंदा कमी झालेले आहे तर पतसंस्थेला या आर्थिक वर्षात ५० लाख ६४ हजाराचा नफा झाला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद ३१ मार्च रोजी जाहीर केला. त्यानुसार या आर्थिक वर्षाअखेर पतसंस्थेच्या ठेवी ३७ कोटी २२ लाख इतक्या असून, कर्जवाटप २६ कोटी ७१ पर्यंत झाले आहे. पतसंस्थेने विविध क्षेत्रात केलेली गुंतवणूक १४ कोटी ६९ लाख इतकी असून, यंदा पतसंस्थेने ५० लाख ६४ हजार इतका नफा मिळवला आहे. संस्थेचा सीडी रेशो ६५.८३ टक्के आहे. निव्वळ एनपीए १.२६, एकूण कर्ज थकबाकी ४.९७ सीआरएआर १६.१३ टक्के, एसएलआर ३६.७५ टक्के आहे. २०२५-२६ साठी ५० कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती अध्यक्ष शीतल पेठे यांनी दिली. सभासदांचा सातत्याने पतसंस्थेवर असलेल्या विश्वासामुळेच यश मिळत आहे, असे अध्यक्ष शीतल पेठे, उपाध्यक्ष सुनील मोघे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक यांनी नमूद केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.