

- rat४p१.jpg -
२५N५५४३१
प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळालेल्या पाटगाव शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान करताना शिक्षक.
अर्णव शिंदे प्रज्ञाशोधमध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ४ ः केंद्रशाळा पाटगाव या प्रशालेत सातवीत शिकणाऱ्या अर्णव शिंदे याने प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच चौथीमध्ये शिकणारा संदेश गोपाळ याने तालुकास्तरावर पाचवा तर जिल्हास्तरावर नववा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अर्णवला त्याचे वर्गशिक्षक अमर पवार यांनी तर संदेशला त्याचे वर्गशिक्षक सचिन खरात यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही जिल्हास्तरावर उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका धने तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन सन्मानित केले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर नटे, उपाध्यक्ष सुरेश भालेकर, सदस्य राजेंद्र भालेकर, पाटगाव गावचा सरपंच ज्योती गोपाळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोपाळ, अनिल साळवी, ग्रामसेवक सार्थक नलावडे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.