पणदूर इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना ''ज्ञानज्योती''

पणदूर इंग्लिश स्कूलच्या
पाच विद्यार्थ्यांना ''ज्ञानज्योती''
Published on

55461

पणदूर इंग्लिश स्कूलच्या
पाच विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठाच्या ५ विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन मुंबईच्यावतीने ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
ग्लोबल फाउंडेशन ही संस्थेची सर्वांत मोठी देणगीदार संस्था आहे. ही संस्था गेली २० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात हातभार लागावा, या हेतूने ही संस्था शैक्षणिक कार्य करते. यावर्षी पणदूर हायस्कूलमधील विघ्नेश पणदूरकर, निधी पवार, हसरी मेस्त्री, जयेश पवार व मुरलीधर पवार या ५ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या शिष्यवृत्तीची ३६०० रक्कम प्रत्येकी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गावडे, सचिव नागेंद्र परब व सर्व संस्था संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक गांवकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्था व प्रशालेने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com