आंबडोस-व्हाळवाडीतील रस्त्याचे नूतनीकरण करा

आंबडोस-व्हाळवाडीतील 
रस्त्याचे नूतनीकरण करा
Published on

55460

आंबडोस-व्हाळवाडीतील
रस्त्याचे नूतनीकरण करा

ग्रामस्थांची मागणी ः जिल्हाप्रमुख सामंतांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः आंबडोस-व्हाळवाडी (ता.मालवण) येथून जाणारा जिल्हा परिषद रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास पावसाळ्यात येथील वाहतूक बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे तात्काळ येथील रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी आंबडोस-व्हाळवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे केली आहे. श्री. सामंत यांनी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मालवण-कसाल राज्य मार्गावरील नांगरभाट स्मशानभूमी येथील आंबडोस कदमवाडी, व्हाळवाडी, मिरवेलवाडी, माळगाव मार्गे बागायत असा जिल्हा परिषद रस्ता जातो. हा रस्ता ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २० वर्षापूर्वी केला आहे. रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण केले होते. मात्र, त्यानंतर एकदाही या रस्त्याची डागडुजी अथवा रस्ता नूतनीकरण केलेले नाही. तसेच या रस्त्याने जांभ्या दगडाच्या चिऱ्याची अवजड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. रस्त्यात डांबर शिल्लकच राहिलेले नाही. या रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास पावसाळ्यात या रस्त्याने कोणतेही वाहन चालविणे धोकादायक ठरणार आहे, या सर्व बाबींकडे ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले.
---
सामंतांकडून मागणीची दखल
दरम्यान, जिल्हाप्रमुख सामंतांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. आमदार राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, रामकृष्ण परब, दीपक नके, हरिश्चंद्र परब, निलेश चव्हाण, वैभव फाटक, विश्वनाथ करावडे, आर्यन साळगावकर, गितेश सावंत, आनंद साळगावकर, प्रकाश चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com