बावनदीत भराव टाकून चौपदरीकरण

बावनदीत भराव टाकून चौपदरीकरण
Published on

- rat४p२.jpg, rat४p३.jpg -
२५N५५४३२, २५N५५४३३
संगमेश्वर ः बावनदीच्या पात्रात टाकण्यात टाकलेली माती आणि दगड.
-------
ग्राऊंट रिपोर्ट--------लोगो

बावनदीत भराव टाकून चौपदरीकरण
तळेकांटे, कोळंबेजवळील प्रकार ; स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप, प्रशासन अनभिज्ञ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाने संगमेश्वरच्या दुतर्फा सध्या वेग घेतला आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची कामे मंद गतीने सुरू असली तरीही रस्त्याचे काम थांबलेले नाही. सध्या आरवली ते संगमेश्वरदरम्यान वेगाने काम सुरू असताना तळेकांटे आणि कोळंबेनजीक बावनदीत भराव टाकून रस्ता केला जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा ऱ्हास असे विदारक दृश्य तळेकांटे ते कोळंबे या गावादरम्यान असणाऱ्या नदीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्हा प्रशासनासह संगमेश्वरच्या तहसीलदारांनी पाहणी करून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी जलदूत शहानवाज शहा यांनी केली आहे.
तळेकांटे आणि कोळंबे गावाजवळ एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला महामार्ग अशी स्थिती आहे. नदी बाजूला असल्याने महामार्गाचे रूंदीकरण करताना प्रथम चक्क नदीच्या काही भागात भराव घालण्यात आला. काही कालावधीनंतर या भरावाला संरक्षक भिंत बांधण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. ही संरक्षक भिंत म्हणजे खरेच एक आश्चर्य असून अभियंत्यांनी यामध्ये तांत्रिक बाबी तपासल्या का? असा प्रश्न हे काम पाहिल्यानंतर पडतो. संरक्षक भिंत बांधताना काढण्यात आलेली माती आणि दगड थेट नदीत टाकण्यात आले आहेत. मुळातच येथे नदी गाळाने भरलेली असताना हा गाळ काढण्याचे काम राहिले बाजूलाच; मात्र नदीत आणखी भराव टाकून नदीचे अस्तित्वच संपवण्याचा प्रकार महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडून सुरू आहे.
तळेकांटे आणि कोळंबे या दोन्ही गावात साधारण एक किलोमिटरच्या परिसरात नदीचे अस्तित्वच संपवण्याचा घाट घातला जात आहे. चौपदरीकरणाचे काम करताना अनेक ठिकाणी नदीत मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. नदीलगत ठेवलेले मातीचे ढीग पावसाळ्यात नदीत जाऊन नदी आणखी गाळाने भरणार आहे. तळेकांटे आणि कोळंबे येथे नदीमध्ये भराव टाकण्याऐवजी जर पिलर्स टाकले असते तर नदीचे अस्तित्व कायम राहिले असते आणि कामाचा दर्जाही राखला गेला असता, असे मत व्यक्त केले जात आहे. मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने तळेकांटे आणि कोळंबे गावच्या ग्रामपंचायतींनी नदीत भराव टाकून केले जाणारे काम रोखावे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस द्यावी, अशी मागणी केली आहे.
-------
कोट
-rat४p४.jpg -
२५N५५४३४
पर्शुराम पवार
संगमेश्वर तालुक्यातील नद्यांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांसह व्यापारी बांधवांकडून केली जात आहे. अशा स्थितीत तळेकांटे ते कोळंबेदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना नदीत भराव टाकून रस्त्याचे सुरू असणारे काम तहसीलदारांनी पाहावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी. हे काम तत्काळ थांबवून यासाठी अन्य पर्याय शोधावा. असे न केल्यास जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत.
-परशुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते
---
कोट
-rat४p५.jpg
२५N५५४३५
- शहानवाज शहा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना बावनदी येथे पूर्वी नदीचे रूंद असणारे पात्र आता केवळ तीस फुटांचेदेखील शिल्लक नसून, या नदीपात्रात राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मातीचा भराव आणि दगडी टाकून ठेवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बावनदी पात्रात मोठमोठी झाडे वाढली आहेत. यामुळे नदीचे पात्र अरूंद झाल्याने बाजूला असणारी माती, दगड यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने याची पाहणी करून तातडीने हा प्रकार थांबवण्याची गरज आहे.
- शहानवाज शहा, जलदूत, चिपळूण
----
कोट
-rat४p६.jpg
२५N५५४३६
- अमोल पाटणे
--------
तळेकांटे अथवा कोळंबे येथे बावनदीत दगडमाती लोटून भराव करणे हे पूर्णत: पर्यावरण आणि निसर्गाच्या विरुद्ध असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ अथवा ग्रामपंचायतीचे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा ठेकेदार विचारातच घेत नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ हतबल झाले आहेत. नदीत भराव करून रस्ता करताना मनमानी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने तळेकांटेपासून कोळंबेपर्यंत बावनदीची तातडीने पाहणी केल्यास सर्व भयावह वास्तव त्यांना दिसून येईल. संरक्षक भिंती उभारण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मर्यादा घालण्यात आली असल्यामुळे तळेकांटे अथवा कोळंबे येथे नदीत भराव करण्यापूर्वी संरक्षक भिंती उभारल्या गेल्या नाहीत.
- अमोल पाटणे, ग्रामस्थ, कोळंबे
----
कोट
-rat४p७.jpg -
२५N५५४३७
वेदांती पाटणे
------
चौपदरीकरणाचे काम आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात अनेक वर्षे रखडल्यामुळे त्याचा या भागातील स्थानिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. प्रत्यक्षात या भागातील काम सुरू झाल्यानंतर तळेकांटे असो अथवा कोळंबे, येथे रूंदीकरण करताना दगडमातीचा भराव थेट नदीत टाकण्यात आला आहे. ही बाब अत्यंत संतापजनक असूनही बावनदी आधीच गाळाने भरलेली असताना त्यात असा भराव टाकणे म्हणजे संतापजनक प्रकार आहे. बावनदी गाळाने भरलेली असताना नदीकाठच्या भागाची गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पावसाळ्यात शेतीमध्ये घुसून दरवर्षी शेतीचे अतोनात नुकसान होते.
- वेदांती पाटणे, माजी पंचायत समिती सदस्य, कोळंबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com