राजापूर पंचायत समिती प्रभारींच्या हाती

राजापूर पंचायत समिती प्रभारींच्या हाती
Published on

राजापूर पंचायत समिती प्रभारींच्या हाती
कामांचा खोळंबा ; बीडीओ, गटशिक्षणाधिकारी पद रिक्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभाराचे प्रमुख असलेले गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पदासह अन्य प्रमुख प्रशासकीय पदे गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार वर्षानुवर्षे प्रभारींच्या हाती आहे. विस्तारलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून सांभाळला जात आहे. या कारभाराला गती मिळण्यासाठी पंचायत समितीतील प्रमुख पदे कार्यरत असणे अपेक्षित असते; मात्र, राजापूर पंचायत समितीचा कारभार वर्षानुवर्षे प्रभारींच्या हाती आहे. गटविकास अधिकारी पद गेले सात महिने रिक्त आहे. कृषी अधिकारी पद सव्वा वर्षे, गटशिक्षणाधिकारी पद गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त आहे. अन्य पदांची त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
----
प्रमुख रिक्त पदे
* गटविकास अधिकारी
* कृषी अधिकारी
* साहाय्यक प्रशासन अधिकारी
* साहाय्यक लेखाधिकारी
* उपअभियंता, बांधकाम विभाग
* गटशिक्षणाधिकारी
---
ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कसरत
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी ९१ ग्रामपंचायत अधिकारी पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६४ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत असून, तब्बल २७ पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यातून गावविकासाला खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com